पारोळा (प्रतिनिधी) : पारोळा तालुक्यातील बोरी नदी पहील्या पावसात दुथडी भरून वाहु लागली आहे. बोरी नदीच्या उगम स्थानी जोरदार पाऊस झाल्याने पहील्याच पावसात बोरी नदीला पुर आल्याचे पाहायला मिळाले. पहील्याच पावसात बोरीला पुर आल्याने शेतकर्या मध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या पावसामुळे नदीकाठाच्या अनेक गावाचे पाणी प्रश्न सुटणार आहे,यामुळे चौफेर आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.