पहाण येथे बंद घराचे कुलूप तोडून दोन लाखाची चोरी

0

पाचोरा | प्रतिनिधी
पहाण तालुका पाचोरा येथे बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी दोन लाख रुपये रोख रकमेसह तीस हजाराचे सोने लंपास केल्याने अज्ञात चोरट्यांनी विरुद्ध पाचोरा पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहाण येथील रामदास सुखदेव पाटील हे पत्नीसह आंबेवडगाव येथे मुलीस भेटण्यासाठी गेले होते दिनांक १६ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी संधीचा फायदा घेऊन घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व घरातील लोखंडी पेटीचे कडी कुलूप तोडून पेटीतील दोन हजार, पाचशे व शंभराच्या नोटा असलेले दोन लाख रुपये रोख व १५ हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या बाळ्या आणि १५ हजार रुपये किंमतीचे चांदिचे कडे असा दोन लाख तीस हजार रुपये किंमतीचा माल लंपास केला. घटनेचा तपास पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पंकज शिंदे हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.