पवित्र रमजान महिन्यात चोपडा आडगाव रस्त्यावरील नाल्यावर पाणी अडवण्याचा कार्यक्रम

0

चोपडा (रमेश जे. पाटील) – चोपडा आडगाव रस्त्यावरील आडगाव नाल्यावर नाला खोलीकरण व भिंत बांधून पाणी अडवण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून या बंधार्‍यात देखील लाखो लिटर पाणी अडकणार असून शेकडो शेतकर्‍यांना याचा थेट फायदा होणार आहे.

आज सकाळी नऊ वाजेची वेळ मुस्लिम समाजातील एका अभ्यासु युवकांकडून कामाच्या सुरुवातीला कोणतेही विघ्न येऊ नये,काम शेवटपर्यत बिनाधिक्कत सफल व्हावे या प्रार्थनासह सुरुवातीला मुस्लिम समाजाच्या रितीरिवाज प्रमाणे मंत्राचे पठण करून या कामावर माजी नगरसेवक तय्यब बागवान यांनी कुदळ मारून या खोलीकरण व पाणी अडवण्याचा कार्यक्रमाला सुरुवात केली आहे.

पवित्र रमजान महिन्यात आपल्या हातून देखील कुठंतरी चांगले काम व्हावे म्हणून माजी नगरसेवक तय्यब बागवान याच्या पुढाकाराने आज या नाला खोकीकरण व नाल्यावर संरक्षण म्हणून सिमेंट बांध बांधण्यात येणार असून याचा सर्व आर्थिक खर्च तय्यब बागवान स्वतः करणार आहेत.हा नाला थेट आडगाव व त्यापूढे म्हणजे जगलातुन त्याला पावसाळ्यात पाणी वाहत असते.किमान एक की मी अंतरावर या नाल्यात पाणी अडकून शेतकर्‍याना त्याचा लाभ होणार असून या नाल्यावर वर आणि खाली दोघे बाजूना आडगाव व चोपडा येथील शेतकर्‍याच्या जमिनीला त्याचा फायदा होणार आहे.

सकाळी नऊ वाजता तय्यब बागवान याच्या हस्ते या कामावर कुदळ मारन्यात आला.यावेळी घनश्याम अग्रवाल मित्र मंडळाचे सदस्य म्हणून दोडे गुर्जर संस्थानचे विश्वस्त प्रवीण पाटील याच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आला तर यावेळी शेतकरी म्हणून किशोर महाजन,भगवान भावसार,इस्माईल बागवान,अतुल शिंपी,जितेंद्र कोळी,कामाचे कॉन्टॅक्टर मोसिंन पठाण आदी उपस्थित होते.

तय्यब बागवान यांनी कामावर बोलतांना सागितले की,आता वेळ बदलली असून शेतकर्‍यांना जागे होण्याशिवाय पर्याय नाही,प्रत्येक शेतकर्‍यांनी ग्रुप तयार करून आपल्या शेतीतून वाहून जाणारे पाणी अडवले पाहिजे.छोटे छोटे नाल्यामधून देखील खूप मोठे पूर वाहून जातात मात्र ते आतापर्यत अडवले गेले नसून येणार्‍या पावसाळयाचे पाणी या नाल्यात अडकून फार मोठी संजीवनी मिळणार असल्याचे सांगितले.

या कामावर तुम्ही सुरुवात करा असे सांगून नाला खोलीकरण करण्याला घनश्याम अग्रवाल मित्र मंडळ आपल्याला पूर्ण सहकार्य करेल असे आश्वासन यावेळी दोडे गुर्जर समाजाचे विश्वस्त प्रवीण पाटील यांनी दिले आहे.उपस्थित शेतकर्‍यांनी देखील या ठिकाणी किमान एक किमी अंतर लांब पाणी थांबून शेतकर्‍यांना खूप मोठा फायदा होणार असल्याचे सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.