पवार विद्यालयात शिक्षक पालक संघाची सभा संपन्न

0

पाचोरा (प्रतिनिधी) :    नगरदेवळा ता.पाचोरा येथील सरदार एस. के. पवार विद्यालयात दि. ७ रोजी सोमवारी सकाळी नऊ वाजता शिक्षक – पालक संघाची सभा ग्रामशिक्षण समितीचे मानद चिटणीस शिवनारायण जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. प्रथम सरस्वती पुजन करून शिक्षक – पालक संघाच्या अध्यक्षपदी मुख्याध्यापक व्ही. बी. बोरसे तर उपाध्यक्षपदी शैलेंद्र बिरारी यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येऊन उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या नऊ महिन्या पासुन शाळा बंद होत्या. दि. ८  मंगळवार पासुन जिल्हाधिकारी यांनी घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करुन नववी ते बारावी पर्यंत चे वर्ग सुरू करण्यात येत असुन पालकांनी आपल्या पाल्यांचे संमती पत्रक दिले तरच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. शाळेत दुपारी अकरा तीस ते बारा या वेळी उपस्थित रहावे, येतांना पाणी बाटली, सॅनिटायझर, मास्क आणावे, सामाजीक अंतर ठेवून रहाण्याचे विद्यार्थ्यांना सांगावे. दररोज चार तास बॅचेस द्वारे एक दिवसाआड होतील. विनाकारण विद्यार्थ्यांना शाळेत पाठवू नये. शाळा सुटल्यावर विद्यार्थ्यांनी टाईमपास न करता घरी जावे.विविध सुचनाही देण्यात आल्या. पालकांतर्फे अशोक सोन्नी यांनी शाळेत विद्यार्थ्यांना मोबाईल वापरण्यास निर्बंध घालण्याची सुचना मांडली त्यास प्रतिसाद देण्यात आला. एप्रील – मे  दरम्यान परिक्षा असतील शिक्षक बांधवांनी रजा न घेता अभ्यास जास्तीत जास्त पूर्ण कसा होईल यावर लक्ष केंद्रित करावे असे अध्यक्षीय मनोगतात शिवनारायण जाधव यांनी सांगितले. प्रसंगी निळकंठ काटकर, किशोर पाटील, अब्दुल गनी शेख, वामन पाटील, जगन पाटील, प्राचार्य व्ही. बी. बोरसे, उपप्राचार्य एस. एल. महाजन, श्रीमती साळुंखे पालक, शिक्षक होते.

Leave A Reply

Your email address will not be published.