Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जळगावात मोकाट कुत्र्यांच्या निर्बिजीकरणात घोटाळा!
    • अतिक्रमणाच्या नादात समांतर रस्ते रखडले!
    • चित्रपट निर्माते आर. चेझियान यांचे ५७ व्या वर्षी निधन
    • जंगलात भडकला भयंकर वणवा : पाहूनच धडकी
    • पोलिसांच्या सतर्कतेने चिमुकल्याची आई-वडिलांशी भेट
    • दीड महिन्यात न्यायालयीन आदेशानंतरही पोलिसांनी चौकशी नाहीच
    • “एक हात मदतीचा” उपक्रमातून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ
    • राष्ट्रवादी एनडीएमध्ये सामील होण्याच्या चर्चेला पूर्णविराम
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»परीट समाजाचा आदर्श विवाह : मुलगी बघण्याच्या कार्यक्रमातच विवाह
    जळगाव

    परीट समाजाचा आदर्श विवाह : मुलगी बघण्याच्या कार्यक्रमातच विवाह

    By May 7, 2019No Comments15 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    आर्थिक खर्चासह रूढी परंपरांना फाटा

    भुसावळ :- जुनाट रूढी व परंपरा यासह खर्चिक बाबींना फाटा देत पसंतीच्या कार्यक्रमातच वधू व वरांकडील मंडळींनी अत्यंत अचूक निर्णय घेऊन समाजापुढे नवा व उत्तम असा आदर्श येथील परीट समाजातील वाघ आणि मोकलकर   या कुटुंबियांनी आपल्या मुलीचा व मुलाचा विवाह करून  समाजापुढे ठेवली . या कौतुकास्पद व समाजहिताच्या निर्णयाचे स्वागत समाजबांधवांनी केले आहे .

    येथील परीट  समाजातील दत्तू वाघ हे त्यांच्या मुलाकरिता अकोला येथील अशोक विश्वनाथ मोकलकर यांची मुलगी बघण्याच्या कार्यक्रमाकरिता समाजातील व नातेसंबंधातील आप्तइष्ठ मंडळींना घेऊन सस्ती येथे गेले होते . मुलाने मुलींला व मुलीने मुलाला बघितले पसंती झाली . आणि पुढील बोलणी सुरु झाली . आजच्या धकाधकीच्या व दुष्काळजन्य पररिस्थिती मध्ये वारंवार गावांना ये जा होऊ शकत नाही . प्रत्येका करिता हा विषय अत्यंत त्रासदायक व खर्चिक ठरतो.

    सध्या विवाह म्हटला की किमान पाच दिवस चालना-या परंपरा डोळ्यासमोर येतात . त्यात पसंती , साखरपुडा , संगीत , मेहंदी , लग्न , यासह वधू  व वरांकडील मंडळींचा व-हाडयांचा मानपान करण्यात मोठ्या प्रमाणात वेळे बरोबरोबरच पैश्याची नासाडी होत असते.हा मानपान सांभाळताना अनेकदा नाहक वादविवाद होऊन विषय विकोपालाही जातात आणि म्हणून .हे सर्व टाळण्याकरिता नांद्रा ता. जळगाव येतथील दत्तू शंकर वाघ यांचे चिरंजीव गजानन वाघ आणि सस्ती, ता. पातूर, जिल्हा अकोला येथील अशोक विश्वनाथ मोकलकर यांची कन्या प्रियंका यांचा विवाह नुकताच या सर्व प्रकारांना फाटा देऊन आदर्श  विवाह झाला. खरं तर मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमासाठी मुलाकडील मंडळी सस्ती येथे गेले होते. मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी चर्चा करून लागलीच विवाह करण्याचा निर्णय घेतला. व केवळ वरमाला ( हार)  टाकून हा विवाह पार पडला. या विवाहाप्रसंगी गजानन दत्तू वाघ, दत्तू शंकर वाघ, अरुण मुकुंदा राऊत, ईश्वर रमेश जाधव, योगेश ईश्वर जाधव आदींसह दोन्ही कुटुंबातील मोजकी मंडळी उपस्थित होती. या आदर्श विवाहाचे परीट समाजातून मोठ्या प्रमाणावर स्वागत करण्यात येत आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    पोलिसांच्या सतर्कतेने चिमुकल्याची आई-वडिलांशी भेट

    July 10, 2026

    गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी पूज्य किरीट भाईजी जळगावात येणार

    July 10, 2026

    प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज

    July 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif