परिवर्तन कला शिबीराचे उद्या उद्घाटन

0

जळगाव | प्रातिनिधी

परिवर्तन जळगाव आयोजित ” परिवर्तन कला शिबिरा”चे उद्घाटन उद्या  बुधवारी सकाळी सात वाजता विद्या इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात होणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद या परिवर्तन  कला शिबिराला लाभला आहे. शंभराच्यावर विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली असून आता प्रवेश बंद करण्यात आला आहे. या शिबिरासाठी पालक व मुलांचा मोठा उत्साह दिसून आला आहे, हे कला शिबिर ‘थ्री डी’ शिबिर आहे . मुलांच्या आयुष्यात जर हे 3 डी आले तर त्यांचं आयुष्य बदलू शकतं,  पाच दिवशीय या कला शिबिरात डान्स , ड्रामा आणि ड्रॉईंग यावर भर दिला जाणार असून या तीनही कलांची प्राथमिक ओळख प्रत्येक मुलाला करून दिली जाणार आहे. डान्सच्या माध्यमातून संगीत आणि नृत्य कलेची ओळख करुन दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आज डांस व संगीत बनले आहेत.  तालासुराच महत्व तसेच नाटकाच्या माध्यमातून आत्मविश्वास व धैर्य हे कशा प्रकारे मिळू शकतं हेही शिकवले जाणार आहे. कारण नाटक हा सर्व कलांचा समुच्चय असतो . तर चित्रकलेच्या माध्यमातून रंग-रेषा या यांचं महत्त्व विद्यार्थी जीवनामध्ये मुलांना पटलं तर  आयुष्य अधिक सुंदर बनवता येऊ शकतं.  अशा आशयाचे  प्राथमिक धडे विद्यार्थ्यांना शिकवले जाणार आहेत.  हे कला शिबिर सर्वांसाठी विनामूल्य असून या शिबिरासाठी विद्या फौंडेशनचे अनमोल सहकार्य लाभले आहे.

या शिबिराचे उद्घाटन 15 मे रोजी बुधवारी सकाळी सात वाजता महापौर सीमाताई भोळे ,  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाणचे अध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील आणि उद्योजक किरण बच्छाव यांच्या उपस्थितीत होणार आहे. शिबिर 15 ते 19 मे या कालावधीत दररोज सकाळी सात ते अकरा या वेळात विद्या इंग्लिश मीडियम स्कूल येथे होणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.