जळगाव :- जळगाव मतदार संघात गेल्या अनेक वर्षापासून विविध विकास कामे गुलाबराव देवकर यांनी आपल्या मंत्रिपदाच्या काळात पूर्ण केलीत. देवकर यांची आजवर विकासाभिमुख वाटचाल असून त्यांना वाढीव मताधिक्याने खासदार बनविण्याचे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी.जी. पाटील यांनी टोळी बांभोरी येथे केले. टोळी बांभोरी गावात डीजी पाटील यांच्याहस्ते महादेव मंदिरात प्रचार नारळ फोडण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यांची होती उपस्थिती
यावेळी माजी जि.प. सदस्य वसंत पाटील, रविंद्र पाटील, राष्ट्रवादीचे युवा नेते विशाल दादा देवकर, प्रफुल्ल दादा देवकर, तालूकाध्यक्ष धनराज माळी, प्रा.एन.डी. पाटील, युवकचे नाटेश्वर पवार, डॉक्टर्स सेल जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन पाटील, महिला तालूकाध्यक्षा शोभाताई पाटील, वैशाली बोरोले, कल्पना आहिरे, सिमा नेहते, कॉग्रेसचे रतीलाल चौधरी, सम्राट परिहार, चंद्रकांत बागुल, गावातील लिलाधर पाटील, धर्मा पाटील, हितेंद्र पाटील, प्रमोद जगताप यांच्यासह बहुसंख्य ग्रामंस्थ उपस्थितीत होते. या नंतर गावातील प्रचारात जेष्ठ पदाधिकारी व ग्रामस्थांशी सवांद साधत खर्या ग्रामविकासाठी परिवर्तनाचे आवाहन केले. यावेळी ग्रामस्थानी देखिल अधिक मताधिक्ये देण्याचे अश्वासन दिले.