परवाना नूतनीकरणासाठी ६०० रुपयांची लाच भोवली !

0

परवाना नूतनीकरणासाठी ६०० रुपयांची लाच भोवली !

तीन जणांना अटक, अँटी करप्शन ब्युरोची कारवाई

 

भुसावळ : लायसन्स नूतनीकरणासाठी आलेल्या प्लंबरकडून ६०० रुपयांची लाच घेताना पाणीपुरवठा विभागातील तीन कर्मचारी रंगेहात पकडले गेले. अँटी करप्शन ब्युरोच्या (ACB) जळगाव युनिटने ही सापळा कारवाई केली असून, आरोपींकडून रोख रक्कम आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

तक्रारदार प्लंबर यांनी लायसन्स नूतनीकरणासाठी भुसावळ येथील पाणीपुरवठा विभागात संपर्क साधला असता, तिथे कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगार शाम समाधान साबळे (वय २८) याने ७०० रुपयांची लाच मागितली. या व्यवहारात विभागातील अभियंता सतीश सुरेशराव देशमुख (वर्ग ३) यांचाही सहभाग होता. त्यांनी फोनवर ६०० रुपये द्यावेत, असे सूचित केले होते.

त्यानुसार तक्रारदाराने २३ एप्रिल २०२५ रोजी लाच रक्कम घेऊन विभागात पुन्हा हजेरी लावली. साबळे याने लाच स्वीकारण्यासाठी लिपिक शांताराम उर्खडु सुरवाडे (वय ५७, वर्ग ४) यांना फोन केला. सुरवाडे यांनी तक्रारदाराकडून ६०० रुपये घेतले आणि त्याच क्षणी ACB च्या पथकाने छापा टाकत तिघांनाही रंगेहात पकडले.

 

सर्व आरोपींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून, त्यांच्याकडील मोबाईल व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलिस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपासाचे नेतृत्व पोलिस निरीक्षक (ACB, जळगाव) करत असून, पथकात सहायक पोलिस उपनिरीक्षक, हवालदार व इतर कर्मचारी सहभागी होते.

Leave A Reply

Your email address will not be published.