परवानाधारक रिक्षा चालकांनी आर्थिक मदतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

0

जळगाव : कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर परवानाधारक रिक्षाचालकांना रुपर्य 1500/- सानुग्रह मदत शासनाने जाहिर केली आहे. हे अनुदान रिक्षा परवानाधारकांच्या बँक खातेमध्ये ऑनलाईन्‍ पध्दतीने जमा होणार असून त्यासाठी परिवहन विभागाने एक प्रणाली विकसीत केली आहे. ही प्रणाली परिवहन विभागाने transport.maharashtra.gov.in या वेबसाईटवर प्रसिध्द केली आहे.

हे सर्व कामकाज ऑनलाईन पध्दतीने होणार असल्याने रिक्षा परवानाधारकांनी त्यांचे मोबाईल क्रमांक, बँक खाते क्रमांक हे आधार क्रमांकाशी जोडून घ्यावेत. वेबसाईटवरील लिंकवर जावून रिक्षा परवानाधारकाने आधार क्रमांकाशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक टाकून ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. ही लिंक मराठीत असून अर्ज भरण्याची प्रक्रिया अत्यंत सुलभ आहे. रिक्षा परवानाधारकाने आपले वाहन क्रमाक, लायसन्स क्रमांक इत्यादीची माहिती लिंकव्दारे भरणे आवश्यक आहे.

सदरची माहिती परिवहन विभागाकडून तपासली जाईल, माहिती बिनचूक असल्यास बँकमार्फेत रिक्षा परवानाधारकांच्या खात्यात ऑनलाईन पध्दतीने अनुदान जमा होईल. ज्या परवान्यांची विधीग्राह्यता 16 डिसेंबर, 2015 नंतर वैध आहे. अशा सर्व परवानाधारकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. याबाबत काही शंका असतील तर त्यांचे स्पष्टीकरण विभागाच्या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. असे श्याम लोही, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.