Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतर रोड आता आंदोलनापासून वंचित!
    • मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ
    • गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख
    • अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट!
    • अपहरणाचा संशय : विमानाचे आपत्कालीन लँडिंग
    • पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन
    • ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी भारत एक मोठी बाजारपेठ
    • दुष्काळी मदतीसह आणखी तीन मोठे निर्णय!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»परळी येथील रेल्वेरुळावर आढळला सीआयडी पोलीस निरीक्षकाचा मृतदेह
    गुन्हे वार्ता

    परळी येथील रेल्वेरुळावर आढळला सीआयडी पोलीस निरीक्षकाचा मृतदेह

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 9, 2024No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बीड ;- पुणे येथे सीआयडी विभागामध्ये कार्यरत असणारे पोलीस निरीक्षक सुभाष भीमराव दुधाळ (वय – 42) यांचा मृतदेह परळी रेल्वेस्थानकाजवळील उड्डाणपुलाखालील रेल्वेरुळावर आढळून आला असून शनिवारी सकाळी दोन तुकडे झालेल्या अवस्थेत हा मृतदेह सापडला. यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी रात्री धुमाळ यांनी रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली असावी अशी शक्यताव्यक्त होत आहे. सुभाष भीमराव दुधाळ हे पुण्यातील सीआयडी विभागात पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत होते. दरम्यान काही महिन्यांपूर्वीच त्यांची बीड येथून पुण्यात बदली झाली होती. आता त्यांचा मृतदेहच आढळून आल्याने पोलीस दलामध्ये खळबळ उडाली आहे. त्यांच्या मृतदेहाजवळ एक चिठ्ठीही आढळली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, परळी रेल्वे स्टेशन मास्तरांनी शनिवारी सकाळी सात वाजता रेल्वेरुळावर एक मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना कळवली होती. ही माहिती मिळताय सहाय्यक पोलीस निरीक्षक परमेश्वर सोगे, पोलीस उपनिरीक्षक साबळे, जमादार बाबासाहेब फड, राजू राठोड, सातपुते व इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

    पोलिसांना परळी रेल्वेस्थानकाजवळील उड्डाणपुलाखालील रेल्वेरुळावर एका व्यक्तीचा दोन तुकडे झालेला मृतदेह आढळून आला. पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेऊन, पंचनामा करून परळी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

    दरम्यान, मयत व्यक्तीचे नाव सुभाष भीमराव दुधाळ असल्याची माहिती रेल्वे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परमेश्वर सोगे यांनी दिली. दुधाळ यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली याची माहिती मिळालेली नाही. तसेच ते परळी येथे कशासाठी आले होते याचीही मिळालेली नाही.

     

     

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #crime CID PUNE POLICE mrutyu Parali
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ

    October 14, 2026

    गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख

    October 14, 2026

    पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन

    October 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif