Saturday, January 28, 2023

परमबीर सिंह यांच्यासह 8 जणांविरूध्द खंडणीचा गुन्हा दाखल

- Advertisement -

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह  यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. परमबीर सिंह यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख  यांच्यावर लेटरबॉम्ब टाकत सचिन वाझे  यांच्यामार्फत पैसे वसुलीचा गंभीर आरोप केला होता. या लेटबॉम्बनंतर राज्याच्या पोलीस दलात आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. तर अनिल देशमुख यांना मंत्रिपदावरुन पायउतार व्हावे लागले. आता परमबीर सिंह यांच्याविरोधात यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

 

- Advertisement -

 

मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात परमबीर सिंह यांच्याविरोधात गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. परमबीर सिंह यांच्यासह 8 जणांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये 6 पोलीस आणि दोन इतरांचा समावेश आहे. भ्रष्टाचार केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणात दोघांना ताब्यात घेतल्याचे वृत्त एका वेबसाईटने दिले आहे. दरम्यान, परमबीर सिंह हे ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना मलबार हिल  परिसरातील अपार्टमेंटमध्ये राहत होते. या अपार्टमेंटमध्ये राहत असताना त्यांनी त्याचे भाडे दिले नसल्याचा  त्यांच्यावर आरोप आहे. परमबीर सिंह यांनी 24 लाख रुपये भाडे थकवल्याचा आरोप आहे.

मागील आठवड्यात राज्य सरकारने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला  आदेश दिले होते. परमबीर सिंह यांच्याविरोधातील तक्रारींचा तपास करण्यास राज्य सरकारने  एसीबीला सांगितले होते. महाराष्ट्र पोलिसांच्या  दोन अधिकाऱ्यांनी सिंह यांच्यावर पैसे घेणे आणि पोलीस दलात पुन्हा घेण्यासाठी कोट्यावधी रुपयांची मागणी केल्याचा आरोप केला होता. याची गंभीर दखल घेत राज्य सरकारने एसीबीला तक्रारींचीबाबत तपास करण्याचे आदेश दिले होते.

परमबीर सिंह हे देखील ईडीच्या रडारवर आले आहेत. त्यांची लवकरच चौकशी होणार असल्याची माहिती समोर लाई आहे. सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी परमबीर सिंह यांना लवकरच चौकशीला बोलावणार असून त्यांचा जबाब नोंदवणार आहे. त्यांना याबद्दल समन्स  सुद्धा बजावण्यात आले आहे.

 

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे