Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतरच्या नावाखाली महिलेवर जबरदस्ती अत्याचार
    • उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात नागपंचमीनिमित्त प्रचंड गर्दी
    • शुल्लक कारणावरून अपहरण करत बेदम मारहाण
    • मुख्यमंत्री फडणवीसांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक
    • बापरे! शाळकरी मुले थोडक्यात बचावली!
    • नाशिक जिल्ह्यात पुन्हा जाणवले भूकंपाचे धक्के
    • माजी महामंत्री विजय चौधरी यांची पक्षातून हकालपट्टी
    • अखेर नाशिक, रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»परमपूज्य जनार्दन हरी महाराजांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांनी राबविले वेगवेगळे उपक्रम
    जळगाव

    परमपूज्य जनार्दन हरी महाराजांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांनी राबविले वेगवेगळे उपक्रम

    By August 29, 2020No Comments25 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     फैजपूर (प्रतिनिधी) :- सतपंथ मंदिर संस्थानचे गादीपती महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या बेचाळीसाव्या अवतरण दिनानिमित्त फैजपूर नगरीत विविध मान्यवरांनी व श्रद्धावानांनी महाराजांचे दर्शन घेऊन विविध उपक्रम राबविले. यात जळगाव येथील सराफ बाजारातील जिवलग मित्र ग्रुप यांनी स्वेटर देऊन महाराजांची तुला करून गरीब मुलांना महाराजांच्या हस्ते स्वेटर वाटण्यात आली.

    धनंजय कीर्तने यांनी 200 मास्क उपस्थितांना वाटले. गुरुदेव सेवा आश्रम जामनेर परमपूज्य श्याम चैतन्यजी महाराज यांनी आंबा व पारिजातकाचे रोप देऊन महाराजांचे अभिष्टचिंतन केले तर कलाविष्कार ग्रुप तर्फे आदिवासी पाड्यावर जाऊन तेथील मुलांना चित्रकलेचे धडे दिले व त्यांना शैक्षणिक सहित्यासह बुंदीचे लाडू वाटप केले. अनेक बालकलाकारांनी महाराजांचे  पेन्सिल तथा कलरने पेंटिंग काढून भेट म्हणून दिल्या. आपल्या वाढदिवसानिमित्त महाराजांनी अनाथांच्या नाथ सिंधुताई सपकाळ यांच्या अनाथ आश्रमाला अकरा हजार रुपये देणगी दिली. सतपंथ मंदिरात दिवसभरात येणाऱ्यांची रीघ लागली होती. मात्र सोशल डिस्टन्सचे पालन करून सॅनिटायझर व मास्कचा  वापर करून मंदिरांमध्ये महाराजांच्या दर्शनासाठी एक-एकांना सोडण्यात येत होते.

    यावेळी  संत सुरेश शास्त्री मानेकर बाबा, स्वामीनारायण गुरुकुलचे शास्त्री भक्ती प्रकाशदासजी, शास्त्री भक्ती किशोर दासजी, परमपूज्य श्याम चैतन्य जी महाराज,  खंडोबा देवस्थानातील राम मनोहरदास  यांच्यासह आमदार शिरीष दादा चौधरी, प्रांत अधिकारी डॉक्टर अजित थोरबोले, जिल्हा परिषद शिक्षण सभापती रवींद्र पाटील, डॉक्टर कुंदन फेगडे,  डॉ. मिलिंद वायकोळे, नगराध्यक्षा महानंदा ताई होले, नगरसेवक  तथा गटनेते बापू वाघुळदे, पांडूरंग सराफ, माजी नगराध्यक्ष निलेश राणे, मसाका संचालक नरेंद्र नारखेडे, हिरालाल चौधरी, विलास चौधरी, भाजपा शहराध्यक्ष अनंता नेहते, नगरसेवक देवा साळी, देवेंद्र बेंडाळे, भुसावळ चे परिक्षित बर्‍हाटे, प्राचार्य व्ही आर पाटील, पंडित कोल्हे आदी मान्यवरांनी हार  पुष्पगुच्छ  तथा केक  आणून महाराजांचा आशीर्वाद घेतला. अनेकांनी फोन व संदेश पाठवून शुभेच्छा दिल्या.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    फुलगावसह पिंपळगाव येथे दोघांची आत्महत्या

    August 17, 2026

    अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

    August 16, 2026

    मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमास वेग

    August 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif