न्यूयॉर्क : सध्या सर्वत्र कोरोना विषाणूच्या साथीने जगभर हाहाकार माजला आहे. करोनाचा सर्वात मोठा फटका अमेरिकेला बसला आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेकडून मोठा निर्णय घेण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. आता कायमचे वास्तव्य करण्यासाठी परदेशातून येणाऱ्यांवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. अमेरिकेतील नागरिकांच्या नोकऱ्यांचे रक्षण करण्यासाठी आणि एका अदृश्य शत्रूशी (कोरोनाव्हायरस) सामोरे जाण्यासाठी असा निर्णय घेतले असल्याचे सांगितले. ट्रम्प यांनी ट्वीट करत, मी कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली ज्यानुसार इतर कोणत्याही देशातील नागरिकांना अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही,असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
“अदृश्य शत्रूकडून झालेल्या हल्ल्यामुळे आमच्या महान अमेरिकी नागरिकांच्या नोकऱ्यांच्या संरक्षणाची आवश्यकता लक्षात घेता, मी अमेरिकेत कायमचे वास्तव्य करण्यासाठी परदेशातून येणे तात्पुरते स्थगित करण्यासाठी कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी करेन!” असे डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी रात्री उशिरा केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. ट्रम्प यांच्या कार्यकारी आदेशाचा तपशील अद्याप मिळालेला नाही. तसेच, त्या आदेशावर कधी स्वाक्षरी करणार याबाबतही ट्रम्प यांनी काही माहिती दिलेली नाही.