जळगाव : व्यवसाय करण्याला नवीन गाडी घेण्यासाठी ५० हजार रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सासरच्यांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील माहेरवाशीन असलेल्या आश्विनी सचिन चव्हाण यांचा विवाह छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पळसवाडी येथील सचिन मोहन चव्हाण यांच्यासोबत झाला आहे. पतीला व्यवयासाठी नवीन गाडी घ्यायची असल्याने त्याने विवाहितेने गाडी घेण्यासाठी माहेरुन ५० हजार रुपये आणावे यासाठी विवाहितेचा छळ सुरु केला. हा छळ असह्य झाल्याने विवाहिता आपल्या माहेरी निघून आल्या. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन विवाहितेचे पती सचिन मोहन चव्हाण, सासू यशोदाबाई मोहन चव्हाण, सासरे मोहन कन्हीराम चव्हाण यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार विजय पाटील हे करीत आहे.