भुसावळ (प्रतिनिधी)– रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल ते हजूर साहिब नांदेड दरम्यान अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील खालीलप्रमाणे:
*गाडी क्रमांक 07313 डाऊन विशेष पनवेल येथून दिनांक १९.३.२०२१ ते ०१.०४.२०२१ दरम्यान दर मंगळवार, गुरुवार, शुक्रवार आणि रविवार रोजी १६.०० वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी ११.०० वाजता हजूर साहिब नांदेडला पोहोचेल.
*डाऊन दिशा स्टॉप – मनमाड – ०४.०५/०४.१०
*गाडी क्रमांक 07314 अप विशेष हजूर साहिब नांदेड येथून दि. १८.०३.२०२१ ते ३१.०३.२०२१ दरम्यान दर सोमवार, बुधवार, गुरुवार आणि शनिवार रोजी १७.३५ वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी १२.३० वाजता पनवेलला पोहोचेल.
अप दिशा स्टॉप – मनमाड-०१.३०/०१.३५
थांबे: कर्जत (केवळ 07313 साठी), लोणावळा (केवळ 07313 साठी), तळेगाव, चिंचवड, पुणे, दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, परभणी आणि पूर्णा.
संरचना: – एक वातानुकुलीत प्रथम श्रेणी सह वातानुकुलीत द्वितीय श्रेणी, एक वातानुकुलीत द्वितीय श्रेणी, दोन वातानुकुलीत तृतीय श्रेणी, १३ शयनयान आणि ४ द्वितीय श्रेणी आसन.
आरक्षणः संपूर्णपणे आरक्षित विशेष गाडी बुकिंग विशेष शुल्कसह सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरु झाले आहे.
उपरोक्त विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या सविस्तर वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस अॅप डाउनलोड करा.
केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल.
प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-१९ शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.