जळगाव | प्रतिनिधी
पद्मालय (ता.एरंडोल) येथील दर श्रावण सोमवारनिमित्त भरणारी यात्रा व यात्रोत्सव यंदा रद्द करण्यात आला असल्याचे श्री गणपती मंदिर देवस्थान विश्वस्त मंडळाने कळवले आहे. कोविड १९ संदर्भात जिल्हा प्रशासनाने नियम शिथील केले असले तरी गर्दीमुळे महामारीचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यावर खबरदारी म्हणून श्रावण सोमवारचा यात्रोत्सव रद्द करण्यात आलेला आहे. भाविकांनी गर्दी करू नये. गणरायाचे घरीच चिंतन, स्मरण करावे असे आवाहनही विश्वस्त मंडळाने केले आहे.