जळगाव | पद्मालय देवस्थान येथे त्रिपुरारी पाैर्णिमेला दरवर्षी हाेणारा यात्राेत्सव यंदा रद्द करण्यात अाला अाहे. काेराेनाच्या पार्श्वभूमीवर हाेणारी गर्दी लक्षात घेता अाजपासून २९ व ३० नाेव्हेंबर, १ डिसेंबर असे तीन दिवस पद्मालय देवस्थान बंद राहणार असल्याचे मंदिर व्यवस्थापनाने कळवले अाहे.
पद्मालय येथे श्री गणेशजींची पौर्णिमा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्रिपुरारी पौर्णिमेला संपूर्ण खान्देशातून भाविक भक्त पद्मालय देवस्थानला दर्शनासाठी येत असतात. वर्षभर केलेले संकल्प, व्रत, नैवेद्य, नवस पूर्ण करण्यासाठी त्रिपुरारी पोर्णिमेला पद्मालय येथे मोठा यात्रा उत्सव होतो. कोरोना संसर्ग वाढत असल्याने यंदा व्यवस्थापनातर्फे खबरदारी घेण्यात येत अाहे.