पदभार स्विकारण्यासाठी आलेले नवीन आयुक्‍त लिफ्टमध्ये अडकले

0

जळगाव :- महापालिकेचे आयुक्‍त चंद्रकांत डांगे यांच्या जागेवर पंधरा दिवसांपुर्वी डॉ. उदय टेकाळे हे आज पदभार घेण्यासाठी पालिकेच्या तेराव्या मजल्यावर असलेल्या कार्यालयात लिफ्टमधून जात असताना चौथ्या मजल्यावर लिफ्ट अचानक बंद पडल्याने नवीन आयुक्‍त लिफ्टमध्ये अडकले होते.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, महापालिकेचे आयुक्‍त चंद्रकांत डांगे यांच्या जागेवर डॉ. उदय टेकाळे यांची पंधरा दिवसांपुर्वी नियुक्‍ती करण्यात आली होती. परंतू, आजारपणामुळे टेकाळे येवू न शकल्याने आज (ता.15) महापालिकेच्या आयुक्‍त पदाचा पदभार घेण्यासाठी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास आले होते.

आयुक्‍तांचे दालन महापालिका इमारतीच्या तेराव्या मजल्यावर असल्याने दालनात जाण्यासाठी पहिल्या मजल्यावरून लिफ्टमध्ये बसले. मात्र लिफ्ट चौथ्या मजल्यापर्यंत गेल्यानंतर अचानक बंद पडल्याने नवीन आयुक्‍त टेकाळे अडकले होते. साधारण तीन- चार मिनिट लिफ्टमध्ये अडकले होते. यानंतर लिफ्टचा दरवाजा उघडल्यावर आयुक्‍तांना बाहेर काढले. येथून दुसऱ्या लिफ्टने ते तेराव्या मजल्यावर जावून पदभार स्विकारला.

Leave A Reply

Your email address will not be published.