पत्रकार संस्था फैजपूरतर्फे पत्रकारदिनी पत्रकार सन्मान सोहळा संपन्न

0

फैजपूर (प्रतिनिधी): मराठी पत्रकार दिन तसेच दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार संस्था फैजपूर यांच्या वतीने शहरातील व परिसरातील सर्व पत्रकार बांधवांना स्मृती चिन्ह,पुष्पगुच्छ तसेच सुवर्ण पदक देऊन विशेष सन्मान करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संतपंथ संस्थान चे गादिपती महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज तर प्रमुख पाहुणे म्हणून फैजपूर विभागाचे प्रांताधिकारी कैलास कडलग, फैजपूर पोलीस स्टेशन चे सहायक पोलिस निरीक्षक श्री.प्रकाश वानखेडे साहेब, ज्येष्ठ पत्रकार अरुण होले,आरिफ शेख उपस्थित होते.पत्रकार संस्था फैजपूर अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत असुन पत्रकार बांधवांचा आवाज बुलंद करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहे.

तसेच शहरी तथा ग्रामीण भागातील सर्व पत्रकार बांधवांना न्याय मिळावा यासाठी देखील नेहमीच प्रयत्नशील असून पत्रकार एकतेसाठी पत्रकार संस्था विविध उपक्रम राबवित असते असे प्रतिपादन महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी यावेळी केले.निष्पक्ष पत्रकारिता करणारे पत्रकार हेच खर्या अर्थाने लोकशाहीचे भक्कम आधारस्तंभ असुन पत्रकार संस्था फैजपूर चं कार्य आदर्शवत आहे असे प्रतिपादन यावेळी प्रांताधिकारी कडलग साहेब यांनी केले.कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पत्रकार नेहमीच मदत करत असतात असे प्रतिपादन यावेळी सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश वानखेडे साहेब यांनी केले.

याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार व देशदूत चे प्रतिनिधी श्री.अरुण होले,लोकमतचे श्री.वासुदेव सरोदे, स्वतंत्र भारत चे प्रा.राजेंद्र तायडे,सकाळचे समीर तडवी,साईमतचे प्रा.उमाकांत पाटील,केसरीराज चे सलीम पिंजारी, तरुण भारत चे संजय सराफ, गावकरी चे इदु पिंजारी, आव्हान चे राजु तडवी,दिव्य मराठी चे नंदकुमार अग्रवाल, जनशक्ती चे निलेश पाटील, जळगाव वृत्त चे विभागीय व्यवस्थापक संदिप पाटील,एशिया एक्स्प्रेस चे कामील शेख,पुण्यप्रताप चे मयुर मेढे, देशोन्नती चे शाकीर मलिक, जळगाव वृत्त तालुका प्रतिनिधी मुबारक तडवी, मुदस्सर नजर,जावेद काझी,रावेर चे शेख नजमोददीन प्रेस फोटोग्राफर मिलिंद महाजन, वृत्तपत्र वितरक बंटी आंबेकर,विकास वाणी, संस्थेचे सदस्य देवेंद्र झोपे, समाजसेवक अशोक भालेराव इ.पत्रकार बांधव उपस्थित होते.पत्रकार संस्था फैजपूर ही संस्था फैजपूर व पंचक्रोशीतील सर्व शहरी तसेच ग्रामीण भागातील पत्रकार बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असून यापुढेही व्यापक प्रमाणावर पत्रकार संस्था आपल्या कार्याचा विस्तार करणार आहे असे प्रतिपादन यावेळी पत्रकार संस्था फैजपूर संस्थापक अध्यक्ष श्री.फारुक शेख यांनी आभार प्रदर्शन वेळी केले.सुत्रसंचालन संदिप पाटील यांनी तर आभार फारुक शेख यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.