अमळनेर प्रतिनिधी: तालुक्यातील आदर्शगाव देवगाव देवळी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार शिवाजी महाजन हे सामाजिक क्षेत्रात विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर व कटिबध्द असतात त्यांचा कामांचा आढावा घेत पुणे येथील पत्रकार मित्र संस्थेद्वारे १४ एप्रिल चे अवचित साधून डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता पुरस्कार २०२१ साठी महाजन यांची निवड करण्यात आली.
महाजन यांनी खूपच कमी वयात अनेक संघटनांची पदे घेऊन आपली जबाबदारी योग्य रीतीने सांभाळली आहे, ते सध्या महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे नाशिक विभागीय उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत,पुणे येथील पत्रकार मित्र संस्थेद्वारे १४ एप्रिल चे अवचित साधून डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता पुरस्कार २०२१ चे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आपले प्रस्ताव पत्रकार मित्र संस्थेकडे पाठविले सर्व प्रस्ताव एकत्रित करून त्यातील १७ मान्यवरांची या प्रसंगी निवड करण्यात आली आहे. हे पुरस्कार त्यांना १ मे २०२१ रोजी महाराष्ट्र दिनाचे अवचित साधून हे पुरस्कार वितरण करण्यात येणार आहेत.पुरस्कार प्राप्त मान्यवराची नावे संस्थेमार्फत घोषित करण्यात आली असून ते पुढीलप्रमाणे.
१) डॉ.शोकिन शर्मा,(चित्तोडगड,राजस्थान)
२) श्री.माणक पुरोषत्तम चौधरी(शहादा,जि.नंदुरबार)
३) ॲड. विद्या सुनिल तावरे(पुणे)
४)अँड. पल्लवी छायारविंद्र प्रकाशकर(शहादा,जि.नंदुरबार)
५) श्री. डी. जि. पाटील(शहादा,जि.नंदुरबार)
६) शिवाजी विनायक पाटील(अमळनेर.जि. जळगाव)
७) श्री. शैलेश गर्ग(अजमेर,राजस्थान)
८) श्री. बाबासाहेब नदाप(कोल्हापूर)
९)श्री. दीपक हिरे (ठाणे)
१०) अमोल ठाकर(पुणे) ११) सुदर्शन चाखले(पुणे)
१२) पुजा नितिन खडसे(दोंडाईचा)
१३) दिपक सीताराम हिरे
१४) प्रतीक्षा दिलीप मानवटकर(नागपुर)
१५) युवराज भीमराव जाधव(चाळीसगाव)
१६) नितीन विनायक नाईक(पुणे)
१७) शीतल विकास महाजन (जळगाव) यांची निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार त्यांना पत्रकार मित्र संस्थेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे ,शिवाजी महाजन यांना महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेश अध्यक्ष अनिल महाजन,जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब महाजन,भिमराव खलाणे,सचिन माळी,डॉ.सुनील देवरे,डॉ.श्रीकृष्ण माळी,राहुल माळी,निलेश माळी आदी पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्यात,महाजन यांच्यावर मित्रपरिवाराकडून शुभेच्छांच्या वर्षाव होत आहे