भातखंडे (प्रतिनिधी) : येथील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेच्या भातखंडे माध्यमिक विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक बी.एन .पाटील यांचा आज पाचोरा- भडगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार किशोर आप्पा पाटील यांनी त्यांचा सत्कार त्यांना नुकतेच मिळालेले “राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार” तसेच अलीकडेच मिळालेला राज्यस्तरीय “आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार” मिळाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी त्यांच्या समवेत त्यांचे माजी विद्यार्थी कथा अहिराणी मराठी कवी सुरेश कदम किशोर आप्पाचे खंदे समर्थक गजू दादा, पाचोरा तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रवीण पाटील, गणेश पाटील हे उपस्थित होते. आमदार किशोर आप्पा पाटील यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.