Saturday, October 1, 2022

पत्रकार दिनेश चौधरी यांना युवा गौरव पुरस्कार जाहीर

- Advertisement -

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

साप्ताहिक युवाच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २० व्यक्तींना सेवा गौरव पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात येणार आहे. त्यात लोहारा ता. पाचोरा येथील पत्रकार दिनेश चौधरी यांना युवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार सोहळा दि. १७ आॅक्टोबर २०२१ रविवार रोजी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा मौलाना आझाद संशोधन केंद्र, टी.व्ही. सेंटर औरंगाबाद येथे संपन्न होणार आहे.

- Advertisement -

- Advertisement -

मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. दिनेश सोनजी चौधरी वेबमीडिया असोसिएशन, मुंबई जळगांव जिल्हा सचिव, व अखिल पत्रकार कल्याण बहुउद्देशिय संस्था, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष या पदावर कार्यरत आहे. दिनेश चौधरी हे व्यापारासोबत गेली २६ वर्ष पत्रकारिकेत कार्यरत साप्ताहिक तसेच अनेक वृत्तपत्रांचे प्रतिनिधी म्हणून काम केले आहे. सद्यस्थितीत ते इलेक्ट्रॉनिक मिडियामध्ये कार्यरत आहे.

उल्लेखनीय कार्य नेहमी गरजूंना मदत करणे, अन्याय ग्रस्तांना पत्रकारिकेच्या माध्यमातून न्याय मिळवून मदत करणे, यासोबतच लोहारा गावातील सतर्क पत्रकार म्हणून विशेष ओळख आहे. दिनेश चौधरी यांची युवा गौरव पुरस्कार निवड झाल्याबाबत पत्राद्वारे युवाशक्ती पत्रकार संघ मराठवाडा (औरंगाबाद) अब्दुल कय्युम यांनी पुरस्कार जाहिर झाल्याचे निवड पत्राद्वारे कळविले आहे.

ह्या पुरस्काराबद्दल दिनेश चौधरी यांचे लोहारा शहर पत्रकार मंच, वेब मीडियाचे संस्थापक अध्यक्ष अनिल महाजन, वेबमिडिया असोशिएशनचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष अजयकुमार जैस्वाल, जिल्हाध्यक्ष ईश्वर चोरडिया सह वेब मिडिया असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच समस्त समाज बांधव, माणुसकी रुग्ण सेवा समुहातर्फे समाजसेवक सुमित पंडित, गजानन क्षिरसागर यांनी कौतुक व अभिनंदन केले आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या