पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाला योग्य दिशा दाखविण्याचे कार्य होत असते – रमेश परदेशी

0

एरंडोल (प्रतिनिधी) :येथे नगर पालिका ,आस्था महिला मंडळ,डॉ.पी.जी.पिंगळे व मकरंद पिंगळे यांच्यातर्फे  सोमवारी ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त  तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.न.पा.सभागृहत झालेल्या कार्यक्रम प्रसंगी प्रां शिवाजी अहीराव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते नगराध्यक्ष रमेश परदेशी, उपनगराध्यक्ष नितीन चौधरी व नगरसेवक प्रा.मनोज पाटील या तिघांच्या हस्ते तालुक्यातील पत्रकारांना शाल,गुलाब पुष्प व पेन देऊन सन्मान करण्यात आला.पत्रकार हा समाजाला योग्य दिशेला नेण्याचे कार्य करीत असल्यामुळे त्यांचे लिखाण हे वास्तव असले पाहिजे असे नगराध्यक्ष रमेश परदेशी यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी नगरपालिकेचे नगरसेवक व कर्मचारी उपस्थित होते.

आस्था महिला मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ महिला चंद्रकला जैन ह्या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणुन माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर, बद्रीसिंग परदेशी, जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष प्रमोद पाटील,मंगला घोडके,दमयंती ठक्कर आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरती ठाकूर यांनी केले तर सुत्रसंचलन नंदा शुक्ला केले तर आभार पायल ठाकुर मानले.यावेळी मिनाक्षी पाटील,ज्योती भागवत, निशा ठक्कर,देवी परदेशी, शालिनी कोठावदे आदी तर मनोहर ठाकुर, बाबूलाल माळी, चंद्रभान पाटील, भाऊसाहेब पाटील, संजय बागड, डॉ प्रशांत पाटील, शेलेश चौधरी, आदी पत्रकार व मान्यवर उपस्थित होते.

डॉ.पी.जी.पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होऊन तालुक्यतील सर्व पत्रकारांचा सत्कार डॉ.मकरंद पिंगळे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर मोराणकर यांनी तर आभार शालिनी कोठावदे यांनी मानले.प्रास्ताविक मकरंद पिंगळे यांनी केले.यावेळी संजय बागड,रोहिदास पाटील,जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष प्रमोद पाटील,एरंडोल तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष बी.एस.चौधरी,शहराध्यक्ष कैलास महाजन,जावेद मुजावर,कुंदन ठाकुर, राजु ठक्कर, सुधीर शिरसाठ,पंकज महाजन,रतीलाल पाटील,आबा महाजन तसेच तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते.

तालुका पत्रकार संघातर्फे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती निमित्त तालुका पत्रकार कार्यालयात कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष प्रमोद पाटील हे होते.प्रमुख पाहुणे म्हणुन तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष बी.एस.चौधरी,शहराध्यक्ष कैलास महाजन,सचिव संजय बागड,पत्रकार जावेद मुजावर,पंकज महाजन,सुधीर शिरसाठ,कुंदन ठाकुर,राजु ठक्कर,आबा महाजन,रतीलाल पाटील,चंद्रभान पाटील,किशोर मोराणकर व तालुका पत्रकार संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.