पत्नी नांदायला येत नसल्याच्या नैराश्यातून जळगावातील तरुणाची आत्महत्या

0

जळगाव :- पत्नी नांदायला येत नसल्याच्या नैराश्यातून एका 22 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज बुधवारी शहरातील रायसोनी नगरात उघडकीस आली. निलेश मधुकर सपकाळे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, याबाबत रामानंदनगर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

निलेशने नुकताच प्रेमविवाह केला होता. प्रेम विवाह करुन देखील पत्नी घरी येत नसल्याने नातेवाईकांनी दि. 9 जुलै रोजी रामानंदनगर येथे राहत असलेल्या पत्नीच्या घरी जाणून तिची समजूत काढली. पंरतू समजून काढून देखील पत्नी घरी येत नसल्यामुळे निलेश निराश होता. या नैराश्यातून आज सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास राहत्या घरात वरच्या मजल्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.  या घटनेबाबत काका शांताराम बाबुराव सपकाळे यांच्या खबरीवरून रामानंदनगर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास मनोज इंद्रेकर करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.