पत्नीवर गोळ्या झाडून मंत्रालयातील सहसचिवाची आत्महत्या

0

मुंबई :- मंत्रालयात सहसचिव विजयकुमार पवार यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी रात्री घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी विजयकुमार यांनी पत्नीवर गोळीबारही केला. या गोळीबारात त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी सोलापूर येथे हलविण्यात आले आहे.

विजयकुमार भागवत पवार मंगळवेढ्यातील मरवडे गावचे रहिवासी असून मंगळवेढा तालुक्यातील ते पहिले जिल्हाधिकारी होते. त्यांनी नंदुरबारचे जिल्हाधिकारी म्हणून देखील काम पाहिले होते. त्यांची नुकतीच मंत्रालयातील कौशल्य विकास विभागात सहसचिव म्हणून बदली झाली होती. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले  नाही. मात्र आत्महत्येपूर्वी त्यांनी पत्नी सोनाली पवार यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये जखमी झालेल्या सोनाली पवारांना उपचारासाठी सोलापूर इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पाटील, निरीक्षक अनिल गाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव मारकड, पोलीस नाईक हरिदास सलगर हे घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.