शेंदुर्णी ता.जामनेर : पत्नीचे अल्पशा आजाराने निधन झाले. दोघांनी अतिशय विपरीत परिस्थितीत आपल्या संसाराचा गाडा हाकला होता.पती प्रिटिंग प्रेस चालवत होते त्यांना पत्नीची सदैव साथ होती.पत्नीचे सौ.कुसुम चंद्रकांत नाईक यांचे अल्पशा आजाराने १६ दिवसांपुर्वी दुःखद निधन झाले. याचा पतीने चंद्रकांत त्र्यंबक नाईक यांनी एवढा धसका घेतला की त्या दिवसांपासून अन्नत्यागच केला यातच करोनाची लागणनाईक झाली उपचारादरम्यान आज सकाळी त्यांचे निधन झाले.
एरंडोल येथील रहिवासी अतिशय मितभाषी असणाऱ्या नाईक कुटुंबातील दोन व्यक्तींच्या १६दिवसांत जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात २ मुले मुली सुना नातवंडे जावई असा परिवार असुन अरविंद साखरे व अशोक साखरे गुरुजी यांचे ते मेव्हणे व बहिण होत.