पतीच्या मृत्युला पाच महिने होवुन सुध्दा पिडीत पत्नीला न्याय मिळत नसल्याने पत्नीचा आत्मदहनाचा इशारा

0

पाचोरा (प्रतिनिधी) : पतीने कोविड सेंटरमध्ये आत्महत्या केल्याचा खोटा बनाव करुन ही आत्महत्या नसुन त्यांचा घातपात झाला असल्याने गेल्या पाच महिन्यांपासून पोलिस स्टेशनच्या चकरा मारत असलेल्या पिडीत पत्नीने दि. १७ डिसेंबर रोजी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपल्या दोन चिमुकल्यांसोबत आत्मदहनाचा इशारा प्रशासनास दिला आहे. अशी माहिती पत्नी भारती विनोद कोकाने यांनी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

बांबरुड (राणीचे) येथील रहिवाशी विनोद रमेश कोकणे (वय – ३४) हे यांना दि. १९ जुलै रोजी ताप व खोकला झाल्याने ते स्वत:हुन वरखेडी रोडवरील कोरोन्टाईन सेंटरमध्ये दाखल झाले होते. त्यांना संबंधित आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी खबरदारी म्हणुन कोरोन्टाईन करुन घेतले होते. त्या अनुषंगाने दि. २० रोजी विनोद कोकाने यांचा स्वॅब घेण्यात आला होता.

दुर्दैवाने त्यांचा रिपोर्ट येण्याच्या अगोदरच कोरोन्टाईन सेंटरमधील चॅलन गेटला विनोद चा मृतदेह संशयास्पद गळफास घेतल्याच्या अवस्थेत आढळुन आल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यांची पत्नी भारती विनोद कोकाने यांनी विनोद यांच्या मृत्युबाबत संशय व्यक्त करत ही आत्महत्या नसुन आघपात असल्याबाबतची माहिती पत्रकार परिषदेद्वारे दिली. तसेच सदर प्रकरणाची सखोल चौकशी न झाल्यास दि. १७ रोजी आपल्या मुलांसह शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आत्मदहनाचा इशारा दिला आहे. या संदर्भातील प्रती जिल्हाअधिकारी जळगांव, पोलिस अधीक्षक व पाचोरा पोलिस स्टेशनला देण्यात आल्या आहेत. याबाबत संबंधित प्रकरणी काय कार्यवाही होते याकडे सर्वांचे लक्ष लागुन आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.