पं.स.सभापती निता पाटील यांची अशासकीय सदस्यपदी निवड

0

 जामनेर (प्रतिनिधी) : – येथील पंचायत समितीच्या सभापती निता कमलाकर पाटील यांची पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा कार्यबल समितीवर सन-२०१९ – २० करीता अशासकीय सदस्य म्हणून निवड करण्यात आलेली आहे.

या निवडी संदर्भातील जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्या स्वाक्षरीचे पत्र नुकतेच निता पाटील यांना प्राप्त झालेले आहे.राज्याचे जलसंपदा तथा वैद्यकिय शिक्षण व जिल्हयाचे पालकमंत्री मा‌.ना. गिरीष महाजन,नगराध्यक्षा साधना महाजन,जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील,भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर,पंचायत समितीचे गटनेते अमर पाटील,कमलाकर पाटील,विनोद पाटील,सुपडू बाविस्कर आदीसह सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या निवडी बद्दल निता पाटील यांचे अभिनंदन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.