पं.स.सभापतींसह सदस्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

0

जळगाव :- महाराष्ट्रातील पंचायत समिती सभापती, उपसभाती व सदस्यांच्या प्रलंबित मागण्यांकरिता माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी २ दिवसांपूर्वी विधानसभेत आवाज उठवला होता. त्यानंतर २७ जून रोजी महाराष्ट्रातील विविध पंचायत समितीच्या सभापती व सदस्यांनी प्रातिनिधीक स्वरुपात आमदार खडसेंच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेऊन निवेदन दिले.

मुख्यमंत्र्यांनी निवेदनातील मागण्यांचा सरकार सकारात्मक निर्णय घेईल असे आश्वासन दिले. या वेळी माजी मंत्री एकनाथ खडसे, आमदार हरीभाऊ जावळे, पंचायत समिती सदस्य संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष दत्ता शिंदे, कोरेगावचे सभापती रजा जगदाळे, उस्मानाबादचे सभापती गजेंद्र जाधव, बोदवडचे सभापती गणेश पाटील, भुसावळच्या सभापती प्रीती पाटील, चोपड्याचे सभापती आत्माराम म्हाळके, चाळीसगावचे स्मीतल बोरसे, पाचोऱ्याचे बन्सीलाल पाटील, सुनील महाजन, पं.स. सदस्य शेखर पाटील, विकास पाटील, गोलू पाटील, दिनेश बोरसे, जितेंद्र पाटील, किशोर गायकवाड, सरफराज तडवी, कमलाकर पाटील, उपसभापती मनीषा पाटील उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना निवेदन देताना राज्यभरातील पंचायत समितीचे सभापती व सदस्य. समवेत आमदार एकनाथ खडसे, हरिभाऊ जावळे आदी.

Leave A Reply

Your email address will not be published.