पं.स.च्या माजी सभापतीसह ११ जणांविरुद्ध अॅट्रासिटीचा गुन्हा, तर १५ जणांविरुद्ध लुटमारीचा गुन्हा दाखल

0

पाचोरा (प्रतिनिधी) : पंचायत समितीचे माजी सभापती सह ११ जणांविरुद्ध पाचोरा पोलिसात अॅट्रासिटी व जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला असुन माजी सभापतीच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून १५ जणांविरुद्ध लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पररधाडे ता. पाचोरा येथील पंचायत समितीचे बन्सीलाल रामदास पाटील यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत आपली पत्नी कविता बन्सीलाल पाटील यांचेसह ७ उमेदवार उभे केले होते. यात दि. १८ रोजी लागलेल्या निकालात त्यांचे सर्व उमेदवार पराभुत झाले आहे. कविता बन्सीलाल पाटील यांचे विरोधात उभ्या असलेल्या उषाबाई विश्वनाथ पाटील ह्मा निवडुण आल्याने गावातील नागरिकांचे आभार मानत असल्याचा राग आल्याने बन्सीलाल पाटील यांनी राहुल भगवान सोनवणे, सोपान शंकर सोनवणे, रविंद्र भिका सोनवणे, विकास विठ्ठल सोनवणे यांचे सह इतरांना लाठ्या काठ्यांनी मारहाण, जातीवाचक शिविगाळ व जीवेठार मारण्याची धमकी दिल्याने राहुल भगवान सोनवणे यांच्या फिर्यादीवरून बन्सीलाल पाटील, मुकेश पाटील, शुभम पाटील, अविनाश पाटील, मनोज पाटील, योगेश पाटील, कविता बन्सीलाल पाटील, संगिता पाटील, सखुबाई महाजन, सुभाष पाटील, लक्ष्मीबाई विजय महाजन सर्व रा. परधाडे ता. पाचोरा यांचे विरुद्ध अॅट्रासिटी व जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा पाचोरा पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आला असुन या घटनेचा तपास पोलिस उपअधीक्षक ईश्वर कातकडे हे करीत आहे.

तर कविता बन्सीलाल पाटील (वय – ३६) यांचे फिर्यादीवरून ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी गावात गुलाल उधडत मिरवणुक काढली होती. मिरवणुकीत वापरण्यात येणारा गुलाल आमच्या घरात का फेकता आहे याचा जाब विचारला असता त्याचा राग येवुन त्यांनी माझ्या कानातील ७ ग्रॅम वजनाची सोन्याच्या बाळ्या जबरीने ओढत मला मारहाण केली. व माझी देरानी संगिता हिच्या गळ्यतील १७ ते १८ ग्रॅमची सोन्याची चैन चोरुन नेत मारहाण केली. जिल्हा दंडाधिकारी यांचे जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याने भैय्या भगवान सोनवणे, प्रशांत विश्वनाथ पाटील, परमवीर विश्वनाथ पाटील, विकास विठ्ठल सोनवणे, अशोक महादु पाटील, सोपान शंकर सोनवणे, आकाश विठ्ठल सोनवणे, आनंदा कडु सोनवणे, पृथ्वीराज सिद्धार्थ सोनवणे, सविता आनंदा सोनवणे, आरती सोपान सोनवणे, योगिता राहुल सोनवणे, रुपाली विठ्ठल सोनवणे, सुमित्रा विठ्ठल सोनवणे, योगिता राहुल सोनवणे यांची सासु (नाव माहित नाही) सर्व रा. परधाडे ता. पाचोरा अशा १५ जणांविरुद्ध लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.