शहरात दैनंदिन योग्य साफसफाईला होणार मदत
फैजपूर (प्रतिनिधी)-पंधरा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर फैजपूर नगर परिषदला कायम स्वच्छता निरीक्षक लाभला आहे. या पदावर येथील लक्षमण हिरामण चावरे यांची नियुक्ती झाल्याचे नगरपरिषद प्रशासन संचालनाचे पत्र पालिकेला दि ४ जून रोजी प्राप्त झाले आहे. दि ७ जून रोजी लक्ष्मण चावरे यांनी पदभार स्वीकारला आहे.
फैजपूर नगर परिषदचे आरोग्य निरीक्षक सेवानिवृत्त होऊन जवळपास पंधरा वर्षे झाली.या काळात पालिकेत कायम आरोग्य निरीक्षकची नियुक्ती अभावी शहरातील साफसफाई च्या नियोजनापासून तर लक्ष ठेवण्यापर्यंत अडचणी निर्माण होत होत्या.प्रभारी आरोग्य निरीक्षक पदाचे तात्पुरते अतिरिक्त कामकाज नगर परिषदच्याच कर्मचाऱ्यांना सोपविण्यात येत होते.
त्यामुळे योग्य अशी साफसफाई अभावी नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या.फैजपूर पालिकेच्या सफाई कामगार पदावर असलेले लक्ष्मण चावरे यांनी स्वच्छता निरीक्षक पदाची पदवी संपादन केल्याने त्यांना फैजपूर नगर परिषदच्या प्रभारी स्वच्छता निरीक्षक पदाचा दोन वेळा दोन वर्षे पदभार देण्यात आला होता.आता पंधरा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर फैजपूर नगर परिषदेला कायम स्वच्छता निरीक्षक लाभला आहे.या पदावर येथील लक्षमण हिरामण चावरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.महाराष्ट्र नगरपरिषद सेवा अंतर्गत महाराष्ट्र नगरपरिपषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी राज्य सेवा स्वच्छता निरीक्षक संवर्गातील गट(क)श्रेणी या पदावर लक्षमण हिरामण चावरे यांची नियुक्ती झाली आहे.या नियुक्तीचे आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय,मुंबई यांचे आदेशाचे पत्र दि ४ जून २०२१ रोजी फैजपूर नगर परिषद कार्यालयला प्राप्त झाले आहे.लक्ष्मण चावरे यांनी दि ७ जून रोजी पदभार स्वीकारला आहे.आता पंधरा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर फैजपूर नगर परिषदेला कायम स्वच्छता निरीक्षक लाभला असल्याने व या पदावर नियुक्ती झालेले लक्ष्मण चावरे हे स्थानीक व त्यांनी प्रभारी स्वच्छता निरीक्षक म्हणून काम केल्याने त्यांच्या अनुभवातून शहरात दैनंदिन नियमित साफसफाईसाठी मदत होणार आहे.