पंतप्रधान मोदी व बिग बींनी आषाढी एकादशीनिमित्त दिल्या मराठीतून शुभेच्छा!

0

नवी दिल्ली – आज आषाढी एकादशी निमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी देशवासियांना आषाढी एकादशीच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी व बिग बींनी मराठी भाषेत ट्वीट केलं आहे.

पंतप्रधान मोदींनी केले मराठीतून ट्वीट
‘आषाढी एकादशीच्या सर्व नागरिकांना मन:पूर्वक शुभेच्छा! विठुराया आणि रखुमाईच्या कृपेने सर्व नागरिकांना सुख, समृद्धी आणि आरोग्य प्राप्त व्हावे, ही माझी विनम्र प्रार्थना’ असं ट्वीट करून पंतप्रधान मोदी यांनी देशातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच देशातील नागरिकांना सुख, समृद्धी आणि आरोग्य प्राप्त व्हावे यासाठी प्रार्थना केली आहे. यासोबतच पंतप्रधानांनी एक व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे.

बिग बींनी केले मराठी भाषेत केले ट्वीट
अमिताभ बच्चन यांनी देखील मराठी भाषेत ट्वीट करून आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘टाळ वाजे, मृदुंग वाजे, वाजे हरीचा विणा || माऊली निघाले पंढरपूरा, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला || ||जय जय राम कृष्ण हरी|| आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा’ असं ट्वीट बिग बींनी केलं आहे.

आषाढी एकादशीनिमित्त सुमारे १० लाखांहून अधिक वारकर्‍यांच्या मांदियाळीने पंढरी नगरी अक्षरश: दुमदुमून गेली आहे. पंढरीची वारी, सावळ्या विठ्ठलाचे दर्शन, चंद्रभागेचे पवित्र स्नान आणि संतांच्या गाठी-भेटी या हेतूने गेल्या महिन्याभरापासून राज्यासह शेजारील कर्नाटक, आंध्र, मध्यप्रदेशातूनही काही दिंड्या, पालख्या पंढरीकडे निघाल्या होत्या. त्या सर्व पालख्या, हजारो दिंड्या आणि सुमारे १० लाखांहून वारकरी आषाढ शुद्ध दशमीच्या मुहूर्तावर पंढरपुरात दाखल झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.