पंतप्रधान मोदी यांचे अयोध्या नगरीत आगमन ; थोड्यावेळात भूमिपूजन

1

अयोध्या : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. दुपारी १२.३० वाजता हा सोहळा पार पडेल.भूमिपूजनाची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून निमंत्रीतही या ठिकाणी येण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांचे अयोध्या त आगमन झाले आहे.सकाळी दिल्लीहून मोदी त्यासाठी रवाना झाले होते. दिल्लीहून वायू दलाच्या विमानाने ते लखनौला आले होते. तेथून ते हेलिकॉप्टरने अयोध्यात दाखल झाले आहे. अयोध्यातील साकेत महाविद्यालयात मोदींचे हेलिकॉप्टर दाखल झाले आहे.

या सोहळ्यादरम्यान सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. तसंच या परिसरात जाण्यासाठी निमंत्रण पत्रिकांवर हाय सिक्युरिटी कोड देण्यात आला आहे. या द्वारेच त्या व्यक्तीला भूमिपूजनाच्या स्थळी प्रवेश देण्यात येणार आहे.

1 Comment
  1. Gulshan paunikar says

    Jay Shree ram❤️

Leave A Reply

Your email address will not be published.