पंतप्रधान मोदी आज काय बोलणार?

0

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशवासियांना संध्याकाळी ५ वाजता संबोधित करणार आहेत. मोदी आज नेमकं काय सांगणार? कोणत्या घोषणा करणार याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागून आहे. देशातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मोदी देशाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान मोदी आज नेमकं काय बोलणार याकडे साऱ्यांचं लक्ष आहे. देश अनलॉकच्या टप्प्यावर असताना अधिक सावधानतेबाबत बोलणार? कोरोनाच्या लसीकरणाबाबत काही नवं धोरण जाहीर होणार? अर्थव्यवस्थेतल्या काही ठराविक क्षेत्रांसाठी पॅकेज घोषित होणार? असे प्रश्न नागरिकांना पडले आहेत.

घोषणा करणार?

देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. अनेक ठिकाणी अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच कोरोना बळींची संख्याही नियंत्रणात आली आहे. मात्र, अजूनही अनेक राज्यात कोरोना लसीकरण सुरू झालेलं नाही. लसींचा तुटवडा असल्याने लसीकरण थांबलं आहे. या पार्श्वभूमीवर मोदी महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.