पंतप्रधान मोदींसह अमित शहा यांनी बजावला मतदानाचा हक्क

0

अहमदाबाद: सतराव्या लोकसभेसाठी तिसऱ्या टप्प्याच्या मतदानाला देशभर सुरुवात झाली असून राज्यातील १४ तर देशभरातील ११५ जागांवर मतदान होत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदारांनी मतदान केंद्रांवर गर्दी केली आहे.

आईचे आशीर्वाद घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमधील रानिप येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.

मतदान केल्यानंतर मोदी यांनी २०० मीटरपेक्षाही जास्त पायी चालत लोकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. दरम्यान मोदी यांनी तरुण मतदारांना 100 टक्के मतदान करण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी कुंभ स्नानसह मतदानाची तुलना केली आणि म्हणाले की, देशाला उज्ज्वल बनवण्यासाठी जास्तीत-जास्त मतदान करण्याचे आवाहन केले.

तर दुसरीकडे भाजप पक्षाध्यक्ष अमित शहा व त्यांची पत्नी सोनल यांनी अहमदाबादच्या नारनपुरा येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. अमित शहा हे गुजरातच्या गांधीनगर मतदारसंघातून उमेदवारी लढवीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.