पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी

0

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केरळ दौऱ्यावर असताना मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमकीचा खुलासा झाला आहे. त्रिशुरच्या गुरुवायुर मंदिराच्या कार्यालयात एका पाकिटामध्ये पाचशे रुपयांच्या नोटेवर मल्याळम भाषेत लिहून ही धमकी देण्यात आली होती.

सूत्रांच्या माहितीनुसार मोदींच्या मंदिर भेटीआधी ही धमकी मिळाली होती. 8 जूनला मोदी केरळ दौऱ्यावर असताना त्यांनी गुरुवायूर मंदिराला भेट देऊन तिथे तुला केली होती. त्यांच्या वजनाएवढं दान त्यावेळी मोदींनी केलं होतं. त्यानंतर सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांकडून मोदींच्या सुरक्षेची पुरेपूर काळजी घेण्यात आली होती. यामध्ये मोदींना जीवे मारले जाईल. त्यांचा गळा कापला जाईल, अशी धमकी मल्याळम भाषेत लिहिली होती. ही धमकी मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांमध्ये एकच खळबळ उडाली होती. आता गुप्तचर यंत्रणेकडून ही धमकी कुणी दिली याचा शोध घेतला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.