Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»क्रीडा»पंतप्रधान मोदींचा महिला हॉकी टीमशी संवाद; ‘तुम्ही निराश होऊ नका, देशाला तुमचा अभिमान आहे..’
    क्रीडा

    पंतप्रधान मोदींचा महिला हॉकी टीमशी संवाद; ‘तुम्ही निराश होऊ नका, देशाला तुमचा अभिमान आहे..’

    Tushar BhambareBy Tushar BhambareAugust 6, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    भारतीय महिला हॉकी संघाच्या खेळाडूंशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवरुन बातचित केली. पंतप्रधानांचे कौतुकाचे बोल ऐकून महिला हॉकीपटूंचे डोळे पाणावले. पंतप्रधानांनी खेळाडूंना प्रोत्साहन देत त्यांच्या खिलाडू वृत्तीची तारीफ केली. फोनवरील संवादावेळी महिला हॉकीपटूंचे भाव कॅमेरात कैद झाले आहेत.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय महिला हॉकी संघाच्या खेळाडूंशी बोलताना त्यांच्या कामगिरीचं कौतुक केलं. ‘पदक येऊ शकलं नाही, तुमच्या कर्तृत्वाची प्रेरणा लाखमोलाची आहे. तुम्ही घाम गाळून केलेल्या कामगिरीमुळे देशातील कोट्यवधी मुलींना प्रेरणा मिळाली आहे. मी हॉकी संघाचे सर्व सहाय्यक आणि प्रशिक्षकांचं अभिनंदन करतो’ असं मोदी म्हणाले. नवनीत कौरला झालेल्या दुखापतीविषयी नरेंद्र मोदींनी आस्थेने चौकशी केली. नवनीतच्या डोळ्याला दुखापत झाली असून 4 टाके पडल्याचं क्रीडापटूंनी मोदींना सांगितलं. ‘तुम्ही निराश होऊ नका, देशाला तुमचा अभिमान आहे. तुमच्या मेहनतीमुळे हॉकीला पुनरुज्जीवन मिळत आहे’ अशा भावनाही मोदींनी व्यक्त केल्या

    #WATCH | Indian Women's hockey team breaks down during telephonic conversation with Prime Minister Narendra Modi. He appreciates them for their performance at #Tokyo2020 pic.twitter.com/n2eWP9Omzj

    — ANI (@ANI) August 6, 2021

    भारतीय हॉकीच्या महिलांनी खेळाडूंनी उपांत्य फेरी गाठून इतिहासात आपले नाव नोंदवले. भारतीय महिला संघाचे हे केवळ तिसरे ऑलम्पिक होते. भारतीय महिला खेळाडूंनी त्यांच्या खेळाद्वारे सगळ्यांना संमोहित केलं. कांस्यपदकाच्या रोमांचक सामन्यात ग्रेट ब्रिटनने भारताला 4-3 ने पराभूत केले. दोन गोलने पिछाडीवर पडल्यानंतर भारताने पुनरागमन केलं होतं. भारतीय महिला संघानं 3-2 अशी आघाडी घेतली होती. पण पदकावर नाव कोरण्यात त्यांना अपयश आलं. भारतीय महिला संघाने पाच मिनिटांत तीन गोल केले. गुरजीत कौरने 25 व्या आणि 26 व्या मिनिटाला तर वंदना कटारियाने 29 व्या मिनिटाला गोल केला. ब्रिटनसाठी एलेना रेयर (16 वा), सारा रॉबर्टसन (24 वा), कर्णधार होली पियर्न वेब (35 वा) आणि ग्रेस बाल्डसन यांनी 48 व्या मिनिटाला गोल केले.

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही महिला हॉकी संघाला प्रोत्साहन देणारे ट्विट केले होते. टोकियो 2020 मध्ये आमच्या महिला हॉकी संघाची महान कामगिरी आम्ही नेहमी लक्षात ठेवू. त्यांनी आपला सर्वोत्तम खेळ केला, असं नरेंद्र मोदी म्हणाले. संघातील प्रत्येक सदस्याची कामगिरी उल्लेखनीय आहे. भारताला या अद्भुत संघाचा अभिमान आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

    दरम्यान, टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला संघाला ग्रेट ब्रिटनने 4-3 ने पराभूत केलं. त्यामुळे भारतीय महिला हॉकी संघाचं कांस्य पदकाचं स्वप्न भंगलं. असं असलं तरी राणी रामपालच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने सेमी फायनलपर्यंत मजल मारुन ऐतिहासिक कामगिरी केली. भारतीय महिला संघ ज्या पद्धतीने खेळला, त्याचं देशभर कौतुक होत आहे.

     

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    India Indian Women's hockey team latest news New Delhi Prime Minister Narendra Modi
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    महाराष्ट्रासह ७ राज्यांत एसआयार मुदतवाढ

    November 7, 2026

    E-20 पेट्रोल 420 इंधन : थेट पुराव्यांसह मोठा आरोप

    November 7, 2026

    भयंकर! एकाच कुटुंबातील ७ जणांची निर्घृण हत्या!

    November 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif