पंतप्रधानांनी घेतली राष्ट्रीय सुरक्षा परिषद; महत्वाच्या मुद्द्यावर झाली चर्चा

0

नवी दिल्ली :– भारत-पाकिस्तानमध्ये वाढलेल्या तणावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवासस्थानी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची बैठक पार पडली. या बैठकीत काहीतरी महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाली असून याबाबत अधिक तपशील मिळू शकला नाही.

या बैठकीला गृहमंत्री राजनाथसिंह, अर्थमंत्री अरुण जेटली, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्याबरोबरच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल आणि परराष्ट्र सचिव विजय गोखले उपस्थित होते.

देशाच्या सुरक्षा व्यवस्थेसंबंधीची ही सर्वोच्च बैठक असते. त्यामुळे या बैठकीत निश्चितच काही तरी महत्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत जैश-ए-महंम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करावे अशी मागणी भारताने केली आहे.

दरम्यान, पाकिस्तान नियंत्रण रेषेजवळ वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत आहे. गेल्या तीन दिवसांपासून हंडवाडामध्ये सुरु असलेली एक चकमक संपली. यामध्ये भारताचे ५ जवान शहीद झाले. इतकेच नव्हे तर त्यांनी थेट भारताच्या हवाई हद्दीचे उल्लंघन करीत भारताच्या लष्करी संस्थांना टार्गेट केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.