पंडित दांपत्याला पुन्हा समाजभुषण पुरस्कार प्रदान

0

सुमित पंडित यांना विधायक कर्तव्यातून ४८ वा पुरस्कार

लोहारा, ता. पाचोरा (प्रतिनिधी):- समाजसेवक सुमित पंडित  व सौ.पूजा पंडित  या दाम्पत्याने बेवारस  व गरजू गरिबांना  मदतीची कला साध्य केली  व तिचाच वापर समाजसेवेसाठी साधनेने करीत असताना या दांपत्याला पुन्हा  समाज भूषण  पुरस्काराने गौरव करण्यात करण्यात आला जिवाजी महाले जयंती निमित्त विविध कार्यक्रम नाभिक सेवा संघाच्या वतीने वडगावको येथे जिवाजी महाले जयंती विविध कार्यक्रम घेऊन साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवुन इतिहासात “होता जिवा म्हणून वाचला शिवा” या उपरोक्त म्हनीने अजरामर झालेले जिवाजी महाले यांची ३८४ वी जयंती निमित्त मावळ्यांच्या वेशभूषेत जिवाजी महाले चौकातून मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणूकीत छत्रपती शिवाजी महाराज,मा साहेब जिजाऊ व बाल मावळ्यांचे मुख्य आकर्षण होत.कार्यक्रमात शाहिरी पोवाडा  विशाल भराटे,अशोक सुरूसे , सुर्यकांत जाधव यांचा पोवाडा चा कार्यक्रम झाला तर डॉ संजय सांभाळकर,शुभम राऊत व ज्ञानेश्वर गिराम यांची व्याख्यान झाले. यावेळी नाभिक समाजाती सामाजिक,शैक्षणिक, राजकीय, औद्योगिक,पर्यावरण, बेटी बचाओ क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करनाराना समाज भुषण व शिवरक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.ह्या पुरस्काराने सर्वत्र समाजामध्ये पंडित दांपत्याचे कौतुक होत.आहे या पुरस्कारात सुमित पंडित यांना सपत्नीक स्मृतिचिन्ह मानपत्र.जिवाजी महालेचीं प्रतीमा व शाल श्रीफळ माण्यवरांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी समाजभूषण पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार घेतांना माणुसकी गृपचे पदाधिकारी सुमित पंडित सौ.पुजा पंडित,संपत सवणे.लक्ष्मी पंडित,राम पंडित आदि उपस्थित होते.सुमित यांना आतापर्यँत राज्यभरातून हा ४८ वा पुरस्कार आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बप्पा दळवी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अनिल भैया चोरडिया,अँण्ड अविनाश कोंडामंगल,एकनाथजी साळे,

शिवनाथ लिंगायत,हनुमान भोंडवे,सुनंदा कुदळे,संतोष चंदन यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार नाभिक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री.माधव भाले यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.