लोकशाही न्यूज नेटवर्क
कासोदा ता, एरंडोल
काही महिन्यापूर्वी जळगाव जिल्ह्यात पंचायत राज समितीचा नवनिर्वाचित आमदारांसह दौरा आला होता. त्यावेळी वनकोठे गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत बांधण्यात आलेल्या संरक्षण भिंतीच्या कामाविषयी तक्रार अर्ज सादर करण्यात आला होता. त्या अर्जासोबत याअगोदर जिल्हाधिकारी, बिडीओ, सीईओ यांच्याकडे दिलेल्या तक्रार अर्जाची प्रतही सोबत जोडली होती.
याची दखल घेऊन संबंधित पंचायत राज समितीच्या अधिकाऱ्यांनी संबंधित कामाची तात्काळ दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे पत्र वनकोठे येथील योगेश लोटन चौधरी यांना आज प्राप्त झाल्याने एकच खळबळ उडुन संबंधित भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांचे धाबे दणाणले आहे. यात सरपंच, ग्रामसेवकासह, पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची देखील चौकशी होऊन गुन्हा दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.