Wednesday, February 1, 2023

पंकजा मुंडे राष्ट्रवादीच्या वाटेवर?? धनंजय मुंडे अडचणीत, जयंत पाटील म्हणतात….

- Advertisement -

मुंबई | राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेनं केलेल्या बलात्काराच्या आरोपांनतर राज्यातील राजकारण तापले आहे.  मुंडेंवर होणाऱ्या आरोपांवर भाजपनं आक्रमक भूमिका घेतली असून राजीनाम्याची मागणी केली आहे. दरम्यान, बलात्काराचा आरोप झाल्यामुळे मुंडेंची अडचण वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना याबाबत विचारलं असता त्यांनी आपलं मत व्यक्त केल.

धनंजय मुंडे प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आता पुढील तपास करत आहेत. त्यामुळे सध्या मी या प्रकरणावर काहीच बोलणार नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केले. मात्र, माझा धनंजय मुंडे यांच्यावर विश्वास असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

पंकजा मुंडे राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

- Advertisement -

यावेळी जयंत पाटील यांना पंकजा मुंडे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाविषयी विचारणा करण्यात आली. त्यावर जयंत पाटील यांनी फार बोलायचे टाळले. माझ्या कानावर अशी कोणतीही चर्चा आलेली नाही, असे सांगत त्यांनी हा प्रश्न टाळला. मात्र, जयंत पाटील यांनी पंकजा मुंडे यांच्या प्रवेशाची शक्यता स्पष्टपणे नाकारलीही नाही. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

यावेळी त्यांनी नवाब मलिक यांच्या जावयावर एनसीबीकडून करण्यात आलेल्या कारवाईविषयी देखील त्यांनी भाष्य केले. नवाब मलिक यांच्या जावयाने गुन्हा केला असेल तर त्याची चौकशी केली जाईल. यामध्ये राज्य सरकारकडून कोणताही हस्तक्षेप केला जाणार नाही. मात्र, जावयाच्या गुन्ह्यासाठी सासऱ्याला जबाबदार धरणे योग्य नाही, असे जयंत पाटील यांनी म्हटले.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे