जळगावच्या कंपनीत १5 हजार रु. भरूनही निराशाच
जळगाव :- जळगाव शहरातील खेडी परिसरातील नारायणी असाेसिएट्स कंपनीत पैसे घेऊन नाेकरीचे आमिष देत राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील 20 वर्षीय तरुणाकडून 15 हजार रूपये घेतले होते. परंतु फसवणूक झाल्याचे कळल्यानंतर त्या तरुणाने नैराश्यातून शुक्रवारी पाचोरा रेल्वेस्टेशन परिसरात आत्महत्या केल्याची घटना घडली. आदिनाथ दत्तू भिंगारे (वय २०, रा. देवळाली, प्रवरा, जि. अहमदनगर) असे मृत युवकाचे नाव आहे.
आदिनाथ भिंगारे याने फसवणूक झाल्याप्रकरणी त्याने एमआयडीसी पाेलिसांकडे तक्रार अर्ज दिलेला आहे. त्याचे शिक्षण १२वी पर्यंत झालेले हाेते. ताे नाेकरीच्या शाेधात हाेता. त्याने दिलेल्या अर्जानुसार त्याचा मित्र अविनाश विक्रम कादे याने त्याला जळगाव येथे डाटा एंट्रीचे काम असून, १५ हजार रुपये महिना पगार मिळेल. त्यासाठी सुरुवातीला १५ हजार रुपये भरावे लागतील, असे सांगितले हाेते. त्याला नाेकरीची गरज असल्याने मित्राला त्याने हाेकार दिला हाेता. २७ जून राेजी आदिनाथ जळगाव येथे आला हाेता. तरूणाकडून पंधरा हजार रूपये घेतल्यानंतर गॅलबे ट्रेडींग इंडीया प्रायव्हेट लि. नवीदिल्ली या कंपनीचे कासमॅटीक व फुड सप्लेमेटरी प्रोेडेक्टची विक्री करण्याचे सांगण्यात आले. 01 जुलै पासून तरूणांची ट्रेनिंग होती. ट्रेनिंग देणार्या शिक्षकाने या सौदर्य प्रसाधनाच्या वस्तूंची कशी मार्केटींग करावयाची याच्या टिप्स दिल्या. त्यावेळी आदिनाथ याने मला मार्केटींग नाही,नोकरी करायवयाची आहे,असे शिक्षाला सांगीतले. मी प्रशिक्षणही घेत नाही.मला माझे पैसे देऊन टाका ,असेही सांगीतले.
नंतर 06 जूलै 19रोजी आदिनाथ पैसे घेण्यासाठी नारायणी असोसीयट येथे गेला असता फर्मचे मालकाने तुला पैसे मिळणार नाहीत, मालाची विक्री करावीच लागेल,असे सुनावले. फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यानंतर आदिनाथ याने एमआयडीसी पोलीस स्टेशनला जाऊन कैफियत मांडली होती. पैसे परत मिळत नसल्याने आदिनाथ प्रचंड मानसिक तणावात वावरत होता. शुक्रवारी धावत्या रेल्वेखाली त्याने आत्महत्या केली. या प्रकरणी पाचोरा लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
युवकाची पोलिसात तक्रार, पण अद्याप गुन्हा दाखल नाही
भिंगारे या युवकाच्या तक्रारीवरून एमआयडीसी पाेलिस खेडी येथील नारायणी असाेसिएट्समध्ये गेले हाेते. त्या वेळी पाच ते सहा जणांची चाैकशी करण्यात आली. या प्रकरणी अद्यापही पाेलिसांत गुन्हा दाखल केलेला नाही. भिंगारे या युवकाने शुक्रवारी अात्महत्या केली. तर दुसरीकडे याची चाैकशी सुरू असल्याचे पाेलिसांनी सांगितले.