Monday, January 30, 2023

नोकरीची सुवर्णसंधी.. पॉवरग्रीड कॉर्पोरेशनमध्ये १ हजार ११० पदांची भरती

- Advertisement -

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये १ हजार ११० पदांवर अप्रेंटिस भरती निघाली आहे. पॉवरग्रीड कॉर्पोरेशनच्या गुरुग्राम, फरीदाबाद, जम्मू, लखनऊ, पटना, कोलकाता, शिलाँग, भुवनेश्वर, नागपूर, वडोदरा, हैदराबाद आणि बंगळुरु येथे वेगवेगळ्या पदांवर एक वर्ष कालावधीसाठी ट्रेनी पोस्टसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

पात्र व इच्छुक उमेदवार powergrid.in वेबसाईटवर जाऊन अर्ज दाखल  करु शकतात.

- Advertisement -

अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २० ऑगस्ट निश्चित करण्यात आली आहे. आयटीआय अप्रेंटिस इलेक्ट्रिकलसाठी उमदेवारांचा इलेक्ट्रिकलमधील आयटीआय उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. डिप्लोमा अप्रेंटिस (इलेक्ट्रिकल आणि सिव्हील) साठी विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रिकल आणि सिव्हील इंजिनिअरींगमधील डिप्लोमा असणं आवश्यक आहे.

ग्रॅज्युएट अप्रेंटिस करण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांचं बीई, बी.टेक आणि बीएसी इंजिनिअरींग झालेलं असेल ते इलेक्ट्रिकल, सिव्हील, इलेक्ट्रॉनिक्स, टेलीकम्युनिकेशन, कॉम्युटर सायन्स मध्ये पदवीधर असणं आवश्यक आहे.

किती असेल स्टायपेंड

आयटीआय अप्रेंटिस: ११ हजार

डिप्लोमा अप्रेंटिस: १२ हजार

ग्रॅज्युएट अप्रेंटिस : १५ हजार

HR एक्झ्युकेटीव्ह : १५ हजार

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे