जळगाव – शहरातील नेहा प्रशांत लुंकड यांच्या स्केच आणि ड्राय पेस्टल पेटींगचे प्रदर्शन 16 ते 30 मे दरम्यान पु.ना. गाडगीळ अॅण्ड सन्स् आर्ट गॅलरी, रिंगरोड येथे होणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन 16 मे रोजी सायंकाळी 6 वाजता महापौर सीमा भोळे यांच्याहस्ते होईल.
याप्रसंगी केसीई सोसायटीचे चेअरमन नंदकुमार बेंडाळे, अॅड. सुशिल अत्रे, डॉ. चंद्रशेखर सिकची, दलुभाऊ जैन आदी उपस्थित राहणार आहेत. नेहा लुंकड यांना तरूण भाटे यांच्या मार्गदर्शनातून चित्रकलेचा छंद लागला. 12 वी नंतर त्या चित्रकला, पेटींगमध्ये समरस झाल्या. नेहा यांनी प्रथमच काढलेल्या पक्ष्यांचा निसर्ग चित्राला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि चित्रकलेबद्दलची त्यांची ओढ, रस वाढतच गेला. आतापर्यंत त्यांनी विविध प्रकारची 60 चित्र रेखाटली आहेत. यातील अनेक चित्र, पेटींगला घरातील हॉल, किचन, बेडरूम, कार्यालये, हॉटेल्स, मोठे सभागृह, मंदिर, शाळा, कला दालन आदी ठिकाणी लावण्यासाठी मागणी वाढत आहे. त्या चित्रांमुळे त्या ठिकाणचे वातावरण प्रसन्न, मंगलमय, प्रोत्साहन, प्रेरणादायी वाटते. 16 रोजी उद्घाटनप्रसंगी हे प्रदर्शन सायंकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत आणि यानंतर 30 मे पर्यंत दररोज सकाळी 11.30 ते रात्री 8 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहील. रसिकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन नेहा यांचे आजोबा आणि राजकमल टॉकीजचे संचालक महेंद्र लुंकड व नेहा यांचे वडील प्रशांत लुंकड यांनी केले आहे.