Sunday, May 29, 2022

नेहरू युवा केंद्र मार्फत शहापूर गावात वृक्षारोपण अभियान

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्ताने सात दिवस सप्ताहमध्ये वेगवेगळ्या दिवशी नियमित कार्यक्रम होत आहेत. यामध्ये सोशल सर्विस दिवस म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

- Advertisement -

मनुष्य हा समाजशील प्राणी आहे .समाजाच्या अडचणी समाजात असणाऱ्या लोकांनी एकत्र येऊन सोडण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे .जागतिक प्रदूषण आणि उष्माघात या सर्वांवर वृक्ष हा एकच रामबाण उपाय आहे. वृक्ष लागवडीचे महत्त्व समजून घेऊन आज शहापूर गावांमध्ये युवकांनी एकत्र येऊन वृक्षारोपणासाठी पुढाकार घेऊन तब्बल दीडशे झाडांची लागवड केली.

प्रत्येक घरासमोर आणि गावाचा आजुबाजूला परिसरात मोकळ्या जागेत वृक्ष लागवड करण्यात आली. प्रत्येक युवकाने आपले स्वतंत्र झाड जगवण्याची जबाबदारी घेऊन हे वृक्ष लागवड करण्यात आली आहे. यामध्ये ग्रामपंचायत सरपंच व सदस्य, आरोग्य सेविका शहापूर गावातील युवकांनी खूप मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. अमळनेर तालुका समन्वयक वैशाली दिपक पाटील यांनी कार्यक्रमाचा पुढाकार घेऊन प्रत्येकाला वृक्ष रोपणाचे महत्त्व सांगून प्रेरित केले.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या