नेवासाजवळ जळगाव पोलिसांच्या वाहनाचा अपघात ; ११ कर्मचारी जखमी

0

जळगाव ;-नगर-औरंगाबाद महामार्गावर माळीचिंचोरा फाट्याजवळ झालेल्या कंटेनर व पोलीस वाहनाच्या अपघातात जळगाव येथील निदर्शने विरोधी पथकाचे अकरा पोलीस कर्मचारी जखमी झाले. केडगाव दुहेरी हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या कर्मचा-यांना बंदोबस्तासाठी नगरला रवाना करण्यात आले होते. हे कर्मचारी जळगावकडे परतत असताना सकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

मंगळवारी सकाळी नगर येथील बंदोबस्त करून जळगाव कडे निघाले होते . सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास नगर – औरंगाबाद महामार्गावर माळीचिंचोरा फाट्याजवळ झालेल्या पोलीस वाहन( क्र.एम.एच १९, सी.वाय- ०३७६) व कंटेनर (सी.जी. -०७ सी.ए. – ३४८५) अपघातात अकरा पोलीस कर्मचारी जखमी झाले असून पोलीस वाहन या वाहनाचे मोठे नुकसान झाले. जळगाव येथील निदर्शने विरोधी पथकाचे सतरा पोलीस कर्मचारी दि.७ एप्रिल रोजी नगर येथे बंदोबस्त कमी आले होते. मंगळवारी सकाळी ७.४५ वाजता आरसीपी क्रमांक ६ प्लाटुनचे एक वाहन नेवासा गावाजवळ कलंडले.यामध्ये अमोल भोसले, मनोज पाटील, हेमंत पाटील, मनोज तडवी, महेंद्र उमाळे, शाम भिल, प्रदीप चव्हाण, सागर पाटील, विजय मधुकर व अशोक मोरे हे दहा कर्मचारी जखमी झाले.

यातील दोघांची प्रकृती गंभीर असून सर्व जखमींना नेवासा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात पोलिस वाहन पुर्णपणे चक्काचुर झाले आहे. सुदैवाने यात पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला नाही. तर इतर कर्मचाऱ्यांची वाहने मंगळवारी सकाळी नगर येथे सुखरूप पोहचली आहे. अपघातच्या संदर्भात जळगाव नियंत्रण कक्षात तात्काळ माहिती देण्यात आली. दरम्यान नेवासा पोलीसांनी घटनास्थळी तातडीने जाऊन अपघातग्रस्तांना मदत केली. यावेळी पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी ग्रामीण रुग्णलयात जाऊन जखमी कर्मचा-यांची विचारपूस केली.

Leave A Reply

Your email address will not be published.