सर्वोच्च न्यायालयाचे राजकीय पक्षांना आदेश
नवी दिल्ली :- राजकीय नेत्यांवर असलेल्या गुन्ह्यांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय दिला आहे. नेत्यांवरील गुन्ह्यांची माहिती वर्तमानपत्रे, वेबसाईट, सोशल मीडियावर प्रकाशित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने देशातील सर्व राजकीय पक्षांना दिले आहेत. राजकारणाचे गुन्हेगारीचा विचार करता सर्वोच्च न्यायालयाचे आदेश अतिशय महत्वाचे असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान या आदेशाचे पालन न केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसार आता सर्व राजकीय पक्षांना ही माहिती आपल्या फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरही ही माहिती प्रसिद्ध करावी लागणार आहे. हा आदेश देताना सर्वोच्च न्यायालयाने राजकारणाचे गुन्हेगारीकरण होत असल्याबाबत चिंता व्यक्त केली. ही चिंता व्यक्त करताना सुप्रीम कोर्टाने देशातील राजकीय पक्षांनी आपल्या नेत्यांवरी गुन्ह्यांची माहिती वर्तमानपत्रे, वेबसाइट्स, फेसबुक, ट्विटर अशा सर्व माध्यमांद्वारे प्रसिद्ध करून त्याबाबत जनतेला माहिती द्यावी असे आदेश दिले आहेत. तसेच गुन्हे दाखल असलेल्या नेत्यांना राजकीय पक्ष उमेदवारी का देतात हेसुद्धा स्पष्ट करावं, असेही न्यायालयानं निर्णयात म्हटलं आहे.

