लोकशाही न्यूज नेटवर्क
गगनबावडा : येथे कोरोना सक्तीच्या लसीकरणा विरोधात आंदोलनात भाषण करताना नेत्यांचा एकेरी शब्दात उल्लेख केल्याचा जाब विचारत बहुजन मुक्ती पार्टीच्या गगनबावडा तालुकाध्यक्ष यांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी गोकुळच्या संचालकांसह सहा जणांविरोधात गगनबावडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
गोकुळचे संचालक बयाजी शेळके (रा.वेसरफ), सहदेव कांबळे, तुकाराम पाटील (दोघे रा. कोदे), शिवाजी राऊत (रा. निवडे), निलेश म्हाळुंगेकर (रा. निवडे), सूर्यकांत पडवळ (रा. मांडुकली पैकी खोपडेवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.
मणदूर ता. गगनबावडा येथील ज्ञानदेव बापू कांबळे (वय ४०) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. या गुन्ह्यातील संशयितांनी ज्ञानदेव कांबळे यांना बोलेरो मध्ये बसवून साळवण येथील अरविंद खाटीक यांच्या दुकानासमोर आणले. दुकानात गोकुळचे संचालक बयाजी शेळके होते. शेळके यांनी मोबाईलमध्ये फिर्यादीने कोरोना लसीच्या सक्तीविरोधात कलेक्टर ऑफिस समोर केलेल्या आंदोलनातील भाषणाचा व्हिडिओ ज्ञानदेव कांबळे यांना दाखवला.