शेंदुर्णी (वार्ताहर) : राज्यात धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम म्हणुनच कि काय आज सकाळपासुनच शेंदुर्णी व परिसरातील वातावरण ढगाळ होते.सकाळी बारीक सरी कोसळत होत्या मात्र दुपारी ४-३०नंतर मुसळधार पाऊस सुरु झाला आहे.
आज बुधवार बाजाराचा दिवस मात्र प्रशासनाने आठवडे बाजर करोनावर मात करण्यासाठी बंद केलेला आहे.तरीही बाजारपेठेत भाजीपाला व ईतर वस्तुंच्या खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी धडक मोहीम उघडुन मास्कचा वापर न करणाऱ्या व सोशल डिस्टंशिन न पाळणारे यांच्या विरोधात आर्थिक दंडात्मक कारवाई चे पडसाद दिसले असुन नागरिक व व्यापारी याचे पालन करतांना दिसत होते.
सकाळ पासुनच पाऊसाचा लपंडाव सुरु आहे. खबरदारीचा उपाय म्हणुनच पाऊस सुरु झाला कि वीजपुरवठा नेहमीप्रमाणे खंडित केला जात आहे.
या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. शेतकरी सुखावला असुन खते,बियाणे घेण्यासाठी दुकानात गर्दी दिसत आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.