भातखंडे | बी एन पाटील प्रतिनिधी
भरपूर पर्यटक फिरायला येत असताना आपल्या सोबत चिप्स वेफर्स सोबत आवडीने ठेवतात, चालत्या गाडीत भूक लागली, किंवा मस्त धावत गाडी अन हिरवा निसर्ग दिसला की काढली पाकिट मग हौसेने खात बसतात, पाकिट संपताच गाडीची विंडो उघडता अन बाहेर पाकिट टाकून दिला अन हात झटकुन पाणी पीले कि विषय क्लोज. अन सफारी करत असताना निसर्ग किती सुंदर आहे, किती छान प्राणी आहेत, यांच संरक्षण करण गरजेचे आहे. अशा काही गोष्टी निघून येतात त्यांच्याकडून, पण त्यांना हे माहित नाहीं की ते जंगलात जे पँकेट टाकलं म्हणजे की एक प्राणीची हत्या केली समजा त्यांनी!! कदाचित जर ते पँकेट खानारी मादा असली तर तीन वन्यजीव च हत्या केली असते, जवळ पास असे मानवी चुकीचे वृत्ता मुळे वर्षातून कित्येक प्राणी आपले जीव गमवतात. म्हणून या गोष्टीकडे आपणास गंभीरतेने बघावेच लागेल. तुम्हाला तुम्ही खाल्लेले वेफर्सचे पँकेट एक कचरा म्हणून गाडित ठेवता येत नसेल तर वन्यजीव च्या घरात कशाला टाकता??
निसर्गात असलेल्या प्रत्येक घटकाच संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. माहित आहे की या धावपळीच्या युगात भरपूर लोकांना या विषयसाठी वेळ मिळत नाही, पण निदान असे कृत्य करुन त्यांचे जीव तरी नका घेऊ..!!!